क्षत्रिय मराठा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी गणेश माडजे यांची निवड.

औसा प्रतिनिधी 
.क्षत्रिय मराठा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी शेतकरी नेते मा.गणेशराव  मडजे यांची निवड करण्यात आली आहे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा विजय मोहिते  साहेबांनी हि जबाबदारी सोपवली आहे. गणेश माडजे यांची जिल्ह्यातील राजकारणात वेगळीच छाप आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, निराधार, कष्टकरी वर्गासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. वेगवेगळे आंदोलन, रास्ता रोको, धरने आंदोलन उपोषण  अशी अनेक यशस्वी केली आहेत. जिल्हयाच्या समीकरणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत असताना मराठा समाजाची जबाबदारीत भर पडली आहे. मराठा समाज सक्षिम करण्यासाठी क्षत्रिय मराठा फाउंडेशन ची देश पातळीवर उल्लेखनीय कामगिरी आहे. स्वराज्य सुपर मार्केट, स्वराज्य टूर्स, स्वराज्य मॅनपावर , स्वराज्य उद्योग समूहाचे अनेक ब्रँड आहेत. बेरोजगार युवकांसाठी रोजगाराची निर्मिती करणे हा प्रमुख उद्देश आहे. नक्कीच येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्यात गणेश माडजे यांच्या नावाने मानाचा तुरा रोवला जाणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल राज्य भरातुन शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments