जाणीव कर्तव्याची विचार भविष्याचा 
प्रशासन आपल्या दारी समाधान शिबिर संपन्न..
औसा प्रतिनिधी 
भारतीय जनता पार्टी औसा च्या वतीने लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार व माजी नगरध्यक्ष किरण आप्पा उटगे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र 7 मध्ये प्रशासन आपल्या दारी समाधान शिबिर नगरसेवक गोपाळ धानुरे यांच्या संपर्क कार्यालयात मध्ये श्रावणबाळ व निराधार दिव्यांग एच आय व्ही ग्रस्त घटस्फोटीत लाभार्थ्यांसाठी प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया बऱ्याचदा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दड वाढवणारी ठरते. वयोवृद्ध दिव्यांग नागरिकांची या जाचातून मुक्तता करण्याच्या उद्दिष्टाने समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला शहरातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या शिबिरात उत्पन्नाचे व हयातीचे जागेवरच जवळपास 295 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र काढून देण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या शिबिरास तहसील कार्यालयाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी, औसा मंडळ अधिकारी भुजबळ, औसा सज्जाचे तलाठी विकास बिराजदार,  आमचे मित्रबंधु व्यंकट औटी, नितीन शिंदे, अंकुश कांबळे, संजय जगताप, सागर कुंभार, विकास पवार व मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य लभले.

Post a Comment

0 Comments