स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका संदर्भात औशात राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न 

औसा प्रतिनिधी 
 स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडनुका संदर्भात आज लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा औसा विधानसभा मतदार संघाचे निरिक्षक मा. दिग्विजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थीतीमध्ये औसा येथे संपन्न झाली.
औसा तालुक्यातील विधानसभा क्षेत्रात असणाऱ्या १०८ गावामध्ये प्रत्येक जिल्हापरिषदेचा एक गट प्रमुख आणि दोन गण प्रमुख याप्रमाणे युवकचे १० गटप्रमुख तर २० गणप्रमुख नियुक्त करण्याचे आदेश तालुकाअध्यक्ष यांना दिले असुन नेमलेल्या गट-गणप्रमुखांनी प्रत्येक गावात एक बुथ दहा युथ याप्रमाणे नियुक्त्या करुण त्याचा अहवाल सादर करण्यास सांगीतले आहे.त्याच बरोबर येणाऱ्या नगपरिषद निवडनुकी बाबबतीत गाफील न राहता युवकांनी आपला सहभाग नोंदवावा औसा नगरीचे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.श्री.डॉ.अफसर बाबा सारखे तगडे नेतृत्व युवकांच्या पाठीशी खंबीर असुन औसा शहराप्रमाणे ग्रामिण भागातही पक्षाला युवकांनी मजबुत करावं येणाऱ्या निवडनुकामध्ये युवकांची भुमिका ही निर्णायक ठरणार असुन युवकामधुन जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांची यादी पक्षाकडे सादर करुण होतकरू आणि चांगला जनाधार असणाऱ्या युवकांनी निवडनुकीमध्ये सहभाग नोंदवण्याचे आव्हाण केलं आहे. त्याचप्रमाने येणाऱ्या काळात गाव तेथे शाखा या युक्तीप्रमाणे प्रत्येक गावामध्ये युवकांची शाखा काढण्याचं आव्हाण तालुकाध्यक्ष यांना केलं आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता युवकांनी पुढाकार घेणं गरजेचं असुन राज्यात देशात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांना रस्त्यावरती उतरून वाचा फोडण्याचं आव्हाण यानिमित्त केलं आहे. या बैठकीमध्ये औसा शहरातील ११ प्रभाग तसेच ग्रामिण भागातील १०८ गावातील बुथ कमिट्यांचा आढावा लवकरात लवकर सादर करण्याचे आव्हाण तालुकाध्यक्ष यांना केले आहे.
या बैठकीसाठी औशाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माजी डॉ.अफसर बाबा शेख,औसा नगरीचे माजी नगराध्यक्ष भरत सुर्यवंशी, नगरपरिषदेचे माजी पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव,माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, सुलेमान शेख प्रदेश सचिव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, वल्लीखा पठाण प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत, शहराध्यक्ष संतोष औटी, शहर कार्याध्यक्ष संगमेश्वर उटगे, उपाध्यक्ष हर्षद धुमाळ, विनोद कदम, सरचिटणीस बाळासाहेब सुरवसे,माजी नगरसेवक रूपेश दुधनकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे औसा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments