मुक्तेश्वर मंदिरात उद्यापासून अखंड शिवनाम हरिनाम सप्ताह सुरू 
औसा प्रतिनिधी
 औसा शहरातील ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर देवालय न्यास च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे अखंड शिवनाम व हरिनाम सप्ताह तसेच परम रहस्य ग्रंथ पारायण सतत धार रुद्राभिषेक व भागवत कथा अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 4 ते 11 जुलै 2022 या कालावधीमध्ये रुद्र पठण, शिव सहस्त्रनाम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या शिवनाम व हरिनाम सप्ताह निमित्त ह भ प सर्वश्री मोहन महाराज जायफळ कर, भागवताचार्य रूपालीताई परतुरकर, सद्गुरु महारुद्र महादेव स्वामी, घटना खंडू महाराज भादेकर राजकुमार स्वामी लाळीकर शिवभक्त परायण नागनाथ क्षीरसागर, देवळाली आणि शिवशरण गुरुजी हिंगोली यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. तसेच दुपारी दोन ते सहा या वेळामध्ये कथा प्रवक्त्या भागवताचार्य रूपालीताई परतुर कर यांच्या संगीतमय कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 11 जुलै रोजी शिवभक्त परायण विश्वनाथ स्वामी वडवळकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड शिवनाम हरिनाम सप्ताहाची सांगता होणार असून ग्रामदैवत मुक्तेश्वर मंदिर येथे आयोजित धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ॲड मुक्तेश्वर वाघदरे अध्यक्ष श्री मुक्तेश्वर देवालय न्यास सप्ताह संयोजन समिती व श्री मुक्तेश्वर भजनी मंडळ औसा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments