वीरशैव समाजाच्या ऐकतेचे प्रतीक हिरेमठ संस्थान 


औसा येथील हिरेमट संस्थान हे वीरशैव समाजाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे चालते बोलते विद्यापीठ आहे. हिरेमठ संस्थानचे लिंगायत गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील शिष्यगणांना शिव दीक्षा सोहळ्याच्या माध्यमातून अध्यात्म आणि परमार्थाचा मार्ग दाखविला आहे. मागील आठ दशकापासून हिरेमठ संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी आषाढ मासी वार्षिक उत्सवाचे भव्य आयोजन करून अखंड शिवनाम सप्ताह काळात शिष्यगणांना भक्तीची पर्वणी देण्यात येते. हिरेमठ संस्थांचे लिंगैक्य गुरु निरंजन शांतिवीर शिवाचार्य महाराज यांनी ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास करून आपल्या अध्यात्म ज्ञानाच्या बळावर संस्थांच्या कार्याला उभारी दिली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ष.ब्र 108 डॉ श्री शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांनी अनेक वर्ष अखंड परंपरा कायम राखीत वीरशैव समाजांना भक्ती, शक्तीचा मार्ग दाखविला. शिवदीक्षा सोहळ्याचे भव्य आयोजन करून देशातील पंचपीठाचे जगद्गुरु यांचे दर्शन घडविण्याचा विक्रम शांतविरलिंग शिवाचार्य महाराज यांनी केला. उज्जैन पिठाचे श्री श्री श्री 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सारख्या उच्च विद्या विभूषित जगतगुरुच्या उपस्थितीमध्ये औसा येथे हिरेमठ संस्थांच्या भक्तांना ज्ञानामृत मिळाले आहे. त्यांच्याच हस्ते हिरेमठ संस्थांचे पिठाधिपती म्हणून बाल तपस्वी ष.ब्र 108 श्री निरंजन शिवाचार्य महाराज यांचा पट्टाभिषेक करविला. हिरेमठ संस्थान औसा, वीरशैव युवक संघटना औसा यांच्या सहकार्याने संस्थांमध्ये आषाढमासी वार्षिक उत्सवामध्ये अखंड शिवनाम सप्ताह कालावधीमध्ये नित्य अन्नदान केले जाते. भक्तांच्या श्रद्धेचे हे पवित्र स्थान म्हणून सद् भक्त या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून शिव दीक्षा घेतात. गुरुपौर्णिमेनिमित्त हिरेमठ संस्थांच्या कार्यास सादर प्रणाम....



 

Post a Comment

0 Comments