अर्थक्रांती व भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी बसवराज (दादा) कोपरे.. 


औसा/ प्रतिनिधी : - प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती हे ब्रीदवाक्य धारण करून अर्थक्रांती व भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ ही सामाजिक संघटना ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. ज्येष्ठ नागरिकांचा जीवन गौरव अभियान संघटनेच्या माध्यमातून राबविले जात असून अर्थक्रांती व भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या औसा तालुका अध्यक्षपदी राष्ट्रीय समन्वयक विजयकुमार दबडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सहस समन्वयक प्रकाश वळसे व रामभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी बसवराज (दादा) कोपरे यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे- बाबुराव शिंदे उपाध्यक्ष  संभाजी शिंदे उपाध्यक्ष, राम कांबळे सचिव, बब्रुवान जाधव सदस्य, दत्तू माळी सदस्य, शेषेराव घोगरे सदस्य, राजकुमार कदम ज्येष्ठ मित्र, किशन कोलते ज्येष्ठ मित्र, संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी बसवराज (दादा) कोपरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments