औसा शहरातील सर्वच प्रभागातील गटारी काढून स्वच्छता करा: सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी 
औसा शहरातील सर्वच प्रभागातील नाल्या पावसापूर्वी काढून घेणे आवश्यक असताना नगरपालिकेने पावसापूर्वी किंचित गटारी स्वच्छ केल्या आहेत. व मुख्य रस्ता हनुमान मंदिर ते जलालशाही चौक ते किल्ला मैदान व हनुमान मंदिर ते हाश्मी चौक मोठी नाली या नाल्या साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाचे  पाणी अडून पाणी लोकांच्या घरामध्ये जात आहे. तसेच चालू असलेल्या विकास कामाचे मटेरियल गटारीत पडल्याने गटारी तुडुंब भरले आहेत, व शहरातील नवीन हद्दीत हाश्मी नगर, कादरी नगर, करीम नगर मध्ये नाल्या नसल्यामुळे ही नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच तिसरा टप्पा हनुमान मंदिर ते जामा मस्जिद पर्यंत सर्व गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे. तसेच घंटागाडी ही प्रभागात वेळेवर येत नाही, तसेच स्टिरीट  लाईट  बंद पडलेले आहेत. तरी सदरील प्रकरणी नगरपालिकेने त्वरित कारवाई करून नाल्याच्या व शहरातील साफ सफाईकडे लक्ष देण्यात यावे. अशी मागणी दिनांक 15 जुलै 2022 शुक्रवार रोजी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना एमआयएमच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनावर एमआयएमचे प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, एडवोकेट आर एम शेख ,हारूणखॉ पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments