सेलू येथे आषाढीनिमित्त आयडियल इंग्लिश स्कूलची दिंडी..
औसा तालुक्यातील सेलू येथील आयडियल इंग्लिश स्कूलच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांची दिंडी मोठ्या उत्सवात काढण्यात आली.शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी विविध संत वारकऱ्यांच्या वेशभूषेत,मृदंगांच्या गजरात तसेच ज्ञानोबा तुकारामाच्या नामघोषात सेलू गावात पायी दिंडी व पालखी मिरवणूक काढली.याप्रसंगी ग्रामस्थ भाविक, भक्तांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले.दिंडीची सुरुवात विठ्ठल-रखुमाईच्या पूजनाने करण्यात आली.यावेळी आयडियल इंग्लिश स्कूलचे संचालक लक्ष्मण कारडे,संचालक व शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत कदम,प्रिया कांबळे, पूजा तेलंगे सोनाली सूर्यवंशी, सुवर्णा पवार,नंदा कमळे,तसेच जि.प.के.प्रा शाळेचे मु. सुरवंशी सर,सहशिक्षिका अर्चना पाटील सर्व शिक्षक व विद्यार्थी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
0 Comments