जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी च्या निर्णयास महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) ची  चपराक.. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली  ठरवली नियम बाह्य.. 
औसा(प्रतिनिधी)मागील दोन आडीच वर्षे कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये पायाला भिंगरी बांधून तालुका पिंजून काढलेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.डॉ.आर.आर.शेख यांच्या विरुध्द खोटया नावाने आणि खोटया तक्रारी करुन विनाकारण बदनामी करण्याचा डाव रचण्यात आला होता आणि याच धर्तीवर अधिकार नसताना आणि चौकशी न करता मनमानी करून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी त्यांना कार्यमुक्त केले होते.जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी डॉ.आर.आर.शेख यांना कार्यमुक्त केल्याने ते आपले न्याय हक्का साठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये गेले असता डॉ.आर.आर.शेख यांच्यावर केलेली कार्यवाही नियमबाह्य असल्याचे सांगून सीईओ च्या आदेशाला स्थगिती देवुन 2002 च्या जी.आर.चे उलंघन केल्याचा ठपका लातूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या वर ठेवला आहे.
         औसा तालुक्यातील रहिवाशी व तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रे व त्या अंतर्गत असणारे जवळपास ३५ आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गाव वाडी तांड्याचा काना कोपरा माहिती आसलेल्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख यांनी कोरोनाच्या तीन हि लाटामध्ये औसा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेसाठी अहोराञ प्रयत्न केले. औसा तालुक्यातील आरोग्य यंञणा आशा कार्यकर्ती अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांना कामाला लावून सर्वसामान्य जनतेची कोरोना मधून मुक्तता केली.ऐवढेच नाही तर कोरोनाच्या लाटेमध्ये राञी अपराञी कधी हि आणि कुठल्याही गाव वाडी तांड्यावरुन त्यांना फोन गेला तर अवघ्या कांही वेळात ते त्या गावात आपल्या आरोग्य यंञणेसह पोंहचत असत. अनेकवेळा तर घरुन आणलेला जेवणाचा डब्बा हि ते कामाच्या धावपळीत न खाता तसेच राहत असल्याचे अनेक नागरिक व त्यांच्या सोबत असणारे  कर्मचारी आजही सांगतात.
       आरोग्य विभागातील कांही वैद्यकीय अधिकारी व कांही कामचुकार कर्मचारी यांनी डॉ.आर.आर.शेख यांची सतत काम करण्याची हातोटी आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना होणारा सतत काम करण्याचा ञास यामुळे या काम चुकार कर्मचारी व या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांनी डॉ.आर.आर.शेख यांच्या विरुध्द वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या या तक्रारी मुळे त्यांची बदली करण्यात आली असून हा त्यांच्यावर व त्यांच्या काम करण्याच्या शैलीवर अन्याय असल्याची चर्चा आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात ऐकायला मिळत होती.
         याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी प्रतिक्रिया देताना सांगितले की माझ्याविरुद्ध मागील तीन महिन्यापासून खोटया नावाने आणि खोटया तक्रारी करुन विनाकारण बदनामी करण्याचा,माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू होता.या प्रकरणाचा तपास लावावा व माझ्या विरुद्ध चालेला हा खोटा प्रपंच थांबवावा असं लेखी पत्र मी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांना दिले असताना सुद्धा त्यांनी याची दखल न घेता मलाच कार्यमुक्त केले होते.त्या अनुषंगाने दाद मागण्यासाठी मी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण गेलो असता मला न्याय मिळाला.

Post a Comment

0 Comments