संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी साजरी 

औसा प्रतिनिधी

 श्री संत सावता माळी मंडळ ऐरोली नवी मुंबई यांच्या वतीने श्री संत सावता माळी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली श्री संत सावता माळी यांनी विठ्ठलाची भक्ती ही पिकविलेल्या पिकामध्ये आणि भाजीपाल्यामध्येच विठ्ठल भक्ती पाहिली. कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई, माझी असे भजन करीत श्री संत सावता माळी यांनी कष्टामध्येच परमेश्वर प्राप्ती आहे हे दाखवून दिल्याने साक्षात विठ्ठल सावता माळी यांच्या दर्शनाला आल्याची कथा सर्वश्रुत आहे. त्यामुळे संत सावता माळी यांचे विठ्ठल भक्तीचे योगदान मोठे असून श्री संत सावता माळी मंडळाच्या विश्वस्त समितीच्या वतीने पुण्यतिथी साजरी केली केली.

Post a Comment

0 Comments