पावसाने दडी मारली असताना बळीराजा वरच्या आधारावर काळ्या आईची ओटी भरू लागला
औसा प्रतिनिधी
हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा वर्तवलेला अंदाज स्पशेल खोटा ठरत असून पावसाचे मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्राचा आठवडा कोरडाच गेला. असून पावसाने दडी मारली असली तरी थोड्याफार ओलाव्यावर बळीराजा काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सज्ज झाला आहे. शेतकरी हा नेहमीच आशावादी असतो निसर्ग निश्चितच आपल्याला साथ देईल या भरवशावर शेतकऱ्यांनी आता खरीप पेरणी करण्यास सुरुवात केली आहे . आर्द्रा नक्षत्राचा आठवडा लोटला तरी पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता पेरणीसाठी उशीर होईल म्हणून सोयाबीन, उडीद ,मूग ,संकरित ज्वारी तूर अशा खरीप पिकाची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. अडचणीचा काळ असला तरी अन्नदाता शेतकरी निसर्गाच्या आशेवर जगत असतो. त्यामुळे आर्थिक अडचणीला तोंड देत शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. यावर्षी खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांनी शासनाने निर्देश दिल्यावरून ऑनलाइन पद्धतीने सवलतीच्या दरातील बियाणे घेण्यासाठी नाव नोंदणी केली पेरणी सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांना अद्याप ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेले बियाणे उपलब्ध झाले नाही. तसेच कृषी सेवा केंद्रामध्ये प्रमाणित बियाणे आणि खताचा तुटवडा जाणवत असून कृषी विभागाचा या बाबीकडे कानाडोळा दिसून येत आहे. त्यामुळे नाविलाजाने शेतकऱ्यांना चढ्या भावाने खत बियाणे खरेदी करावे लागत आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला काळ्या आईची ओटी भरणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे एकीकडे महागाईचा सामना आणि दुसरीकडे नैसर्गिक संकट आणि आवर्षणग्रस्त परिस्थिती असताना सुद्धा शेतकरी पदरमोड करून खरीप पेरणीच्या कामात गुंतला आहे औसा तालुक्यामध्ये यावर्षी सर्वाधिक नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन लागवडीकडे झुकला आहे.प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ पंजाबराव डक यांनी 5 जुलै नंतर पाऊस पडेल असा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
0 Comments