औसा शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील राशन कार्ड लाभार्थ्यांचे कार्ड एकत्रित राशन दुकानाशी जोडा:खुंदमीर मुल्ला
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील नवीन प्रभाग क्रमांक ९ येथे एकूण पाच ते सहा गल्ली समाविष्ट असून सदरील प्रभागातील अनुक्रमांक एक मोमीन गल्ली, फुलारी गल्ली येथील राशन कार्ड धारकांना एकत्रित एका राशन दुकानावर कार्ड जोडून मोमीन गल्ली येथे राशन धान्य दुकान देण्यात यावे. अनुक्रमांक दोन भावसार गल्ली येलमवाडा, दिनशाम वाडा,सगरे गल्ली येथील राशन कार्ड धारकांना एकत्रित एका दुकानावर जोडून भावसार गल्ली येथे राशन दुकान देण्यात यावे. अनुक्रमांक तीन दंडिया गल्ली व कुरेश गल्ली येथील राशन कार्ड धारकांना स्वतंत्र राशन दुकानाशी जोडून दंडिया गल्ली येथे राशन दुकान चालू करण्यात यावे. हे की वरील प्रभाग क्रमांक येथील राशन कार्ड लाभार्थ्यी विविध राशन दुकानाशी जोडण्यात आलेले आहेत.त्यामुळे लाभार्थ्यांचे घर ते राशन दुकानाचे अंतर १ ते २ किलोमीटर लांब आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला धान्य आणण्यास वाहनांची सोय करावी लागत आहे. जे धान्य खरेदी पेक्षा वाहनांचे भाडे जास्त होत आहे. तरी वरील सर्व बाबीचा विचार करून जिल्हा पुरवठा अधिकारी लातूर साहेबांनी आपल्या स्तरावरून प्रभाग क्रमांक ९ येथील लाभार्थ्याचे स्वतंत्र मोमीन गल्ली, भावसार गल्ली, दंडीया गल्ली अशी तीन राशन दुकान जोडून देण्यात यावे. अशी मागणी विलासराव देशमुख युवामंचच्या वतीने 18 जुलै 2022 सोमवार रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी लातूर यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष तथा दक्षता समितीचे सदस्य खुंदमीर मुल्ला यांची स्वाक्षरी आहे.
0 Comments