सत्तरधरवाडी येथे उद्योजकता जाणीव शिबिराचे आयोजन
औसा प्रतिनिधी
आज दिनांक 6/7/2022रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ लातूर मार्गदर्शित, झाशीची राणी लोकसंचलित साधन केंद्र औसा व rseti यांच्या संयुक्त विद्यमाने  सतरधरवाडी गावात उद्योजक्ता जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सुतार सर यांनी महिलांना छोट्या उद्योगातून मोठा उद्योग करून उद्योजक कसे बनायचे हे सांगितले, तसेच मान्देशी फाउंडेशच्या प्रतिमा पाटील यांनी आर्थिक साक्षरता यावर महिलांना मार्गदर्शन केले. स्वामी मॅडम यांनी परसबाग विषयी माहिती देऊन डेमो करून दाखवला. तसेच या कार्यक्रमात व्यवस्थापक मंगल वाघचौरे यांनी vo सस्टेन्ड करणे, सबप्रोजेकट, mother डेयरी, me loan, CMEGP, संमन्नती फायनान्स, याबाबत मार्गदर्शन केले.
   यावेळी कार्यकारिणीच्या कोषध्यक्ष पूजा राठोड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच सुभद्रा  बंडगर, crp प्राजक्ता, सह्योगीनी कल्पना काजळे व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments