औसा येथे 5 ते 7 ऑगस्ट रोजी
आचार्य भातखंडे संगीत समारोह
औसा प्रतिनिधी
औसा येथील माऊली प्रतिष्ठानच्या वतीने श्री मुक्तेश्वर मंदिरात तीन दिवसीय आचार्य भातखंडे संगीत समारोहाचे
आयोजन करण्यात आले असून औसेकराना तीन दिवस मोफत शास्त्रीय गायन वादनाची
मेजवानी मिळणार आहे.
5 ऑगस्ट रोजी दत्ता राजे, पं. विठ्ठलराव जगताप, पं. बाबुराव बोरगावकर यांचे दुपारी 2 ते 7 या वेळात शास्त्रीय गायन होणार आहे.
6 ऑगस्ट रोजी स्वरानंद सूर्यवंशी, पं. गिरीश गोसावी यांचे शास्त्रीय गायन आणि पं. रेवैय्या वस्त्रदमठ यांचे संवादिनी सोलो दुपारी 2 ते 7 या वेळात होणार आहे.
रविवार 7 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत अदिती जोशी, हेमा उपासनी, पं. डॉ. विकास कशाळकर आणि पं. शिवरुद्र स्वामी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.
यावेळी पं. डॉ राम बोरगावकर , पं. पांडुरंग मुखडे , तेजोवृष जोशी , पं. दिपक लिंगे , जनार्धन गुडे , तेजस धुमाळ , शंकरराव जगताप , संजय सुवर्णकार , चैतन्य पांचाळ यांची साथसंगत राहणार आहे.
0 Comments