औसा शहरातील मुख्य रस्ता रुंदीकरण टप्पा 3 चा निधी उपलब्ध करून द्या; अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी भेटून केली विनंती 
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या टप्पा ३ अंतर्गत 'वेस हनुमान मंदिर ते जामा मस्जिद' रस्त्याचे भूसंपादनासह रुंदीकरण व सुधारणा काम करण्यासाठी ५ कोटी ५७ लक्ष रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, लातूर यांनी प्रधान सचिव १, नगरविकास विभाग यांना मंजुरीसाठी सादर केलेला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे यांची भेट घेऊन सदरील प्रस्तावाला प्राधान्याने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आमदार पवार यांनी केली. मा मुख्यमंत्री या कामासाठी सकारात्मक असून 'कालच ५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे, या कामासाठीही लवकरच निधी उपलब्ध करून देतो' अशा शब्दात त्यांनी मला आश्वस्त केले आहे.अशी आमदार पवार यांनी सांगितले. 
औसा मतदारसंघाचे विकासाचे सर्वच विषय एक एक करून मार्गी लागतील याची मला खात्री आहे. अशी आमदार अभिमन्यु पवार यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments