जयश्री पांडे यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेला प्रवेश द्वारासाठी 25000 रुपये भेट.
सेवानिवृत्ती दिवशीच केली घोषणा
औसा प्रतिनिधी
बेलकुंड जिल्हा परिषद शाळेमधे गेल्या 9 वर्षापासून शिक्षक पदावर काम करत असताना गेल्या 37 वर्षापासुन होळी हंडुर्गी, भादा 2013 ते 2022 एकूण 9 वर्षे बेलकुंड जिल्हा परिषद शाळेमधे ज्ञानार्जनाचे विद्यार्थ्याला चांगले धडे देऊन चांगल्या प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्याला शिकवण्यात आले. बेलकुंड जिल्हा परिषद व शालेय समितीच्या वतीने व ग्रामपंचायत च्या वतीने साडी व भर पेरावा आयर करून पती पत्नीचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सोबत 2 मुली व जावई उपस्थित होते. सेवानिवृत्त झाल्याबद्दल बेलकुंड जिल्हा परिषद शाळेमधे कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी मनोज बनकर यांची बदली झाल्याबद्दल आणि जयश्री पांडे यांची निवृत्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी दोघांनीही मनोगत व्यक्त करून बेलकुंड शाळेबद्दल व शाळेतील शिक्षकाचे व गाव वाल्याचे आभार मानले. त्यावेळी बोलताना जयश्री पांडे मॅडम म्हणाल्या की, आपन शाळेची काही देण घेणे लागते म्हणून शाळेच्या प्रवेश द्वारा साठी 25000 रुपयाची मदत मुख्याध्यापक किरण पाटील यांच्या हातात रोख स्वरुपात देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास तपासे, बेलकुंड चे सरपंच विष्णु कोळी, उपाध्यक्ष माधुरी पाटील, सदस्य गोविंद वगरे, कैलास कांबळे, व्यंकट काकडे, दिनकर कुलकर्णी, केदार खेडकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना शिंदे गोविंद, मुंढे जी. एस., बिराजदार संजीव, विभुते संजय, सीमा कुलकर्णी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेवी वाडकर प्रास्ताविक शशिकला गवलवाड आभार गणेश दीक्षित यांनी मानले.

Post a Comment

0 Comments