*माळी समाजातील गुणवंतांचा रविवार दिनांक 24 जुलै 2022 रोजी गौरव सोहळा* 
माजी मंत्री मा.आ.श्री.अमित देशमुख, मा.आ. श्रीमती प्रज्ञाताई सातव यांची उपस्थितीत संपन्न होणार.

 *माळी सेवा संघ महाराष्ट्र आणि अ. भा. महात्मा फुले समता परिषद, लातूरच्या* वतीने माळी समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमात उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेत यशाची भरारी घेणारे तरुण आणि स्थानिक निवडणुका किंवा इतर क्षेत्रात यश मिळविलेल्या विशेष व्यक्तींचा रविवार, दि. 24 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता येथील दगडोजीराव देशमुख सभागृह, मार्केट यार्ड लातूर येथे गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला माजी मंत्री आमदार श्री. अमित देशमुख, आमदार श्रीमती प्रज्ञाताई सातव यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष मकरंद सावे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निखील पिंगळे, श्री. मधुकर गुंजकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी दहावीत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण, बारावीत 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण, पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण माळी समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासोबतच स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या समाजातील तरुणांचा आणि स्थानिक निवडणुका आणि अन्य क्षेत्रात विशेष कामगिरी बजावून नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तींचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. 
या कार्यक्रमाला माळी समाजातील विद्यार्थ्यांसह समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माळी सेवा संघाचे राज्याचे अध्यक्ष पद्माकर वाघमारे, उपाध्यक्ष श्रावण उगले, सचिव भारत काळे औसा तालुका अध्यक्ष सचिन माळी आणि विद्यार्थी सत्कार संयोजन समितीने केले आहे.

Post a Comment

0 Comments