प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचे थकीत हप्ते त्वरित वाटप करा
विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने निवेदन
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने औसा नगरपालिकेच्या माध्यमातून औसा शहरात एकूण 2018 सालीपासून ते आज रोजी पर्यंत 650 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजने खाली मंजुरी मिळालेली असून सदरील योजना तीन टप्प्यात राबविण्यात आलेली आहे त्यापैकी सन 2018 साली 116 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली असून त्या 116 लाभार्थ्यांना मागील चार वर्षात फक्त निधीचे तीन हप्ते एकूण एक लाख पन्नास हजार रुपये इतकीच मिळाली असून व तसेच दुसऱ्या टप्प्यात 129 लाभार्थ्यांना ही निधीचे तीन हप्ते मिळालेली आहेत. व तिसऱ्या टप्प्यातील 421 लाभार्थ्याला निधीचे दोन हप्ते मिळालेली आहे. हे की मागील चार वर्षात पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांना निधीचे फक्त तीन हप्ते मिळाल्यामुळे त्यांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असून सध्या पावसाळ्याच्या दिवसातही त्यांना उघड्यावर संसार करावा लागत आहे. तरी औसा शहरातील एकूण 650 लाभार्थ्यांना त्वरित त्यांचे राहिलेले निधीचे हप्ते वाटप करण्यासाठी औसा नगरपालिकेला निधी उपलब्ध करून देण्यात यावे. अशी मागणी दिनांक 7 जुलै 2022 गुरुवार रोजी विलासराव देशमुख युवा मंच औसा यांच्या वतीने लातूर जिल्हा अधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी निवेदन देताना विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला, मुस्तफा आलुरे, आरिफ कुमारकीरी यांची उपस्थिती होती.
0 Comments