नसीर कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त बोअरचे उद्घाटन
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील कुरेशी समाजाचे अध्यक्ष नसीर कुरेशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुरेशी गल्ली आझाद चौक येथे 17 जूलै रविवार रोजी अफसर शेख युवा मंचच्या वतीने बोअर घेण्यात आले.यावेळी या बोअरचे उद्घाटन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुलेमान अफसर शेख यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुलेमान शेख,नसीर कुरेशी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अँड वकील इनामदार,उमर पंजेशा यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमात पाशाभाई शेख,साहेब,बाबु करपुडे, रहेमान लोहारे,व स्थानिक नागरिक उपस्थित होते.या बोअरला 4 इंची पाणी लागल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments