हिप्पर सोगा सोसायटीवर स्वंयप्रभाताई पाटील यांचे तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथील विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक स्वंयप्रभाताई पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सर्व 12 उमेदवार विजयी झाले या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत स्वंयप्रभाताई पाटील यांची सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केला. त्यांच्या विकास रत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनल मधून सर्वसाधारण मतदारसंघातून स्वतः स्वंयप्रभाताई पाटील, चंद्रशेखर सोमवंशी, धोंडीराम आळंदकर, भगवान आळंदकर, भारत आळंदकर, अमोल पाटील, विठ्ठल सूर्यवंशी राम संपते, महिला मतदारसंघातून यादव सुवर्णा, पार्वती सोमवंशी इतर मागासवर्गीय मतदार संघातून नागनाथ मुस्के व अनुसूचित मतदार संघातून दामू चित्तापूरे बहुमताने विजय झाले. या निवडणूक निर्णय अधिकारी सह मनीषा कातरे यांनी काम काज पाहिले सर्व विजयी उमेदवारांचे गावात डॉल्बी लावून जल्लोषात भर पावसात मिरवणूक काढण्यात आली. ताईनी गेले 15 वर्ष लाखावरील उलाढाल कोटीवर गेली असून स्वंकीय विरोधक सर्व समान वागणूक व न्याय सर्वांच्या सर्व वेळ गरजेचे उपलब्धता समक्ष नेतृत्व असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती संचालिका स्वंयप्रभाताई पाटील यांचे हे निर्विवाद श्रेय आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कुठलाही भेदभाव न करता केलेल्या कामाची पावती मतदारांनी मतदानातून औसा तालुक्यातील देशमुख परिवारांच्या नेतृत्व काम करणाऱ्या या झुंजार महिला नेतृत्वाला विजय केले त्याबद्दल त्यांनी समस्त गावकऱ्यांचे आभार मानले. या निवडणुकीत हिप्परसोगा येथील समस्त ग्रामस्थ लहान थोर महिला व तरुणी युवक सर्वांनी अथक परेशान घेतले.
0 Comments