होटेल रॉकलॅन्ड हे शुद्धतेचे प्रतीक ठरेल सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर 
औसा प्रतिनिधी
 औसा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेशप्पा कारंजे यांचा कुटुंबीयांना सामाजिक कार्याचा वारसा लाभलेला आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार त्यांच्या कुटुंबावर असल्यामुळे उद्योग व सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत भरारी घेतली आहे. त्यांचे सुपुत्र सागर आणि सून शरयू यांच्या संकल्पनेतून हॉटेल रॉकलॅन्ड शुद्ध शाकाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे होटेल रॉकलॅन्ड हे लातूर जिल्ह्यातील सर्व शौकिनांसाठी शुद्धतेचे प्रतीक ठरेल असे प्रतिपादन सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश दादा पाटील ,अखिल भारतीय सदस्य, व सक्षम सल्लागार दिव्यांग विभाग महाराष्ट्र शासन हे होते .यावेळी बोलताना सुरेश दादा पाटील म्हणाले की नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 च्या लगत कारंजे खडी केंद्र जवळ हॉटेल रॉकलॅन्ड हे अतिशय शुद्ध शाकाहारी भोजनाच्या व्यवस्थेचे केंद्र ठरणार आहे. कारंजे परिवाराचा अथक प्रयत्नातून हे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. कार्यक्रमासाठी तहसीलदार भरत सूर्यवंशी, भारतीय जनता पार्टीचे लातूर शहर अध्यक्ष गुरुनाथ मगे, युवा मोर्चाच्या प्रेरणा ताई होनराव, रिलायन्स ऍकॅडमीचे प्रा उमाकांत होनराव, माजी नगराध्यक्ष किरण उटगे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. औसा लातूर राष्ट्रीय महामार्गावर सर्व सुविधांनी युक्त विनम्र आणि तत्पर सेवेचे हे केंद्र झाल्यामुळे खाना शौकिनांसाठी हे हॉटेल वरदान ठरणार असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये दिसून आली.

Post a Comment

0 Comments