श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे विद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम
 औसा प्रतिनिधी .
औसा तालुक्यातील फत्तेपुर येथील श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे विद्यालय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 2022 मार्च मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये या विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखून घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचा यावर्षी 97 टक्के निकाल लागला असून या वर्षी एकूण 133 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून सर्व प्रथम कुमारी साक्षी अवदुंबर दळवे 94.80% सर्व द्वितीय कुमारी गायत्री दत्तात्रय तौर 93 . 60 %  सर्व तृतीय कुमारी निकेता गणेश मोगरगे 93.00 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले.तसेच 90%  पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी 11 असुन विशेष प्राविण्यासह 78 प्रथम श्रेणी 41 द्वितीय श्रेणी 14 असे  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण
 विद्यार्थ्यांच्या उज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिव संचालक मंडळ मुख्याध्यापक मुळे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments