संत बाळूमामाचे आशीर्वाद मिळणे भाग्याचे सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर
 औसा प्रतिनिधी
 श्री संत बाळूमामा यांनी आदमापुर येथे आपल्या कर्मभूमी मध्ये ईश्वराचे निस्सीम भक्ती करीत अनेक चमत्कार घडविले. श्री संत बाळूमामा हे चमत्कारी संत होऊन गेले त्यांच्या पुण्याईने अनेक जणांचे भाग्य उजळले आहेत. संत बाळूमामाचे आशीर्वाद मिळणे हे भाग्य आहे असे प्रतिपादन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. विश्वनाथ कांबळे यांच्या शेतातील संत बाळू मामाच्या मंदिर मूर्ति स्थापना व कलशारोहण प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना सद्गुरू गहिनीनाथ महाराज म्हणाले की बाळूमामा ची पुण्याई भाग्यवान चालत मिळते त्यामुळे बाळुमामा नी दाखवून दिलेला परमार्थ सेवेचा मार्ग भक्तांनी आणि करावा आणि आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे असे ही सद्गुरु म्हणाले. बुधवार दिनांक आठ जून रोजी विश्वनाथ कांबळे यांच्या मौजे खुर्द वाडी येथील शेतात श्री संत बाळूमामा यांच्या मूर्तीची स्थापना आणि मंदिराचा कलशारोहण सोहळा सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर आणि ह भ प एकनाथ महाराज बिर्ला यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सर्वश्री सुनील गावडे किसन कोलते काशिनाथ सगरे गिरीधर जंगाले जयपाल ठाकूर बालाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर व सुवासिनी महिला तसेच भक्तगण उपस्थित होते. पुरोहित बबन जोशी यांनी मूर्ती स्थापनेचा धार्मिक विधी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पाडला. मंदिर कलशारोहण नंतर भाविक भक्तासाठी महाप्रसाद ची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व श्री किसन कांबळे विश्वनाथ कांबळे सुभाष कांबळे राम कांबळे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments