औसा शहरातील प्रत्येक प्रभागात मच्छर प्रतिबंधक धूर फवारणी करा..

औसा प्रतिनिधी
औसा शहरातील प्रत्येक प्रभागात मच्छर प्रतिबंधक धूर फवारणी करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औसाच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे सध्या औसा शहरात डेंगू, मलेरिया, व इतर तत्सम आजाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे वयोवृद्ध व लहान बालके तसेच सदृष्य सतत आजारी पडण्याचे प्रमाणात वाढ झालेली आहे. सध्याचे अवकाळी पाऊस व मोसमी पावसामुळे त्यात आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून व जनतेचे आरोग्य हित लक्षात घेऊन सबंध औसा शहरात तात्काळ प्रतिबंधक धूर फवारणी करून सहकार्य करावे, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने पालिका प्रशासनासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिनांक 8 जून 2022 बुधवार रोजी   दिले आहे. यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संताजी
औटी, तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत,शहर सरचिटणीस अमर रड्डे,अफसर शेख, अँड सय्यद मुस्तफा इनामदार,माजी स्वीकृत सदस्य रूपेश दुधनकर, बासीद शेख,  आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments