मोगरगा येथे शिवराज्यभिषेक दिन साजरा
 औसा प्रतिनिधी 
औसा तालुक्यातील मोगरगा येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कुळवाडीभूषण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे लातूर जिल्हा अध्यक्ष दिनकर निकम यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सरपंच रविकांत निकम ग्रामसेवक श्रीमती भंडारकर, संभाजी मुळे, सुधाकर सोनवणे, भास्कर उसके, अरविंद सोनवणे यांच्यासह गावातील इतर नागरिक उपस्थित होते. छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करून खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य प्रस्थापित करून तळागाळातील बहुजन समाजाला एकत्रित करून आपले मावळे सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली होती. म्हणून मोगरगा येथे शिवराज्यभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवरायांना शिवप्रेमींनी मानाचा मुजरा केला.

Post a Comment

0 Comments