पवन कांबळे यांचा विवाह थाटात संपन्न..
औसा प्रतिनिधी
औसा येथील कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक अंगद रामा कांबळे यांचे सुपुत्र पवन (रामेश्वर) कांबळे यांचा विवाह मुक्तेश्वर मंगल कार्यालय मुक्तेश्वर मंदिर उंबडगा रोड औसा येथे दिनांक 6 जुन 2022 सोमवार रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी विवाह थाटात संपन्न झाला.या विवाह सोहळ्यात कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील या़चे सुपुत्र शरण बसवराज पाटील, माजी नगराध्यक्ष किरण उटगे, संगमेश्वर ठेसे, सुनील मिटकरी, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, प्रदेश चिटणीस बसवराज धाराशिवे, पंचायत समितीचे सदस्य दिपक चाबुकस्वार, उदगीर पंचायत समितीचे सदस्य रणजित कांबळे,मुख्य आडिटर उमाकांत पवार, पोलिस निरीक्षक दिलीप डोलारे,माजी उपनगराध्यक्ष जावेद शेख,माजी नगरसेवक गोपाळ धानोरे,मुजाहेद शेख,अॅड समियोद्दीन पटेल, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, तालुकाध्यक्ष दंत्तोपंत सुर्यवंशी, शहराध्यक्ष शकील शेख,माजी सभापती बाळासाहेब गायकवाड, ओबीसी सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्रा.सुधीर पोतदार,बबन बनसोडे, जयराज कसबे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, लातूर जिल्हा प्रभारी संतोषप्पा मुक्ता, संतोष चिकुरडेकर,आदि   सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व पत्रकार, उद्योग व्यवसाय क्षेत्रातील मान्यवरांनी पवन अंगद कांबळे यांच्या विवाहानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.आलेल्या मान्यवरांचे अंगद रामा कांबळे परिवाराच्या वतीने आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments