एम आय एम ची औशात आढावा बैठक संपन्न
औसा प्रतिनिधी
*ए आय एम आय एम औसा 
*आज .दी. १९ / 0६ / २0२२  / रोजी एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खा.बँ.मा.असदोद्दीन ओवेसी  यांच्या आदेशानुसार एम आय एम  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खा.मा.सय्यद इम्तियाज जलील ,एम आय एम महाराष्ट्र प्रदेश कार्य अध्यक्ष मा.डॉ. गफ्फार कादरी ,एम आय एम महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा.सय्यद मोईन ,तसेच एम आय एम लातूर जिल्हा अध्यक्ष मा.मोहम्मंद अली शेख यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय विश्राम ग्रह औसा येथे एम आय एम औसा शहरामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .त्या अनुषंगाने दिनांक 19 जुन रविवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी औसा नगर पालीका निवडणूक एम आय एम पुर्ण ताकदीने सर्व जागा लढविणार असे प्रतिपादन एम आय एम चे जिल्हाध्यक्ष मोहम्मद अली शेख यांनी सांगितले. या बैठकीत एम आय एम पक्षाचे वरीष्ठ नेतेमंडळी याची लवकरच औसा शहरामध्ये एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा.सय्यद मोईन  यांची सभा होणार आहे .तसेच आज एम आय एम पक्षामध्ये युवकांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी या आढावा बैठकीत  एम आय एम माजी औसा तालुकाध्यक्ष Adv.गफुरुल्लाहा हाशमी ,एम आय एम युवानेते.सय्यद कलिम,सय्यद जमीर, शेख अहेमद,पटवेकर मुकत्तदीर सोहेल बागवान,इमरान बागवान,सौदागर इमरान, कुरेशी सोहेल,शेख अब्दुल भाई, शेख अतिक,सय्यद रहीम,आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments