राज्यसभा निवडणुकीच्या रोमहर्षक विजयाचा औशात भाजपतर्फे जल्लोष 
औसा प्रतिनिधी
 राज्यसभेच्या महाराष्ट्र राज्यातील सहा जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सूत्रबद्ध नियोजन करीत सहापैकी तीन जागेवर दणदणीत रोमहर्षक विजय मिळवून उज्वल यश संपादन केले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील ,विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 10 जून रोजी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वश्री पियुष गोयल, डॉक्टर अनिल बोंडे,आणि धनंजय महाडिक यांचा विक्रमी मताने विजय झाला .या विजयाचा औसा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, प्रा भीमाशंकर राचट्टे,ऍड अरविंद कुलकर्णी, ऍड मुक्तेश्वर वाघदरे, श्रीमती सोनाली गुळभिले, सौ कल्पना ताई डांगे, धनंजय परशाने ,शिवरुद्र मुर्गे, मकरंद रामपुरे, दादासाहेब विसपुरे ,पवन राज शेटे ,सागर आपुरणे, शहराध्यक्ष लहू कांबळे, संघटक नारायण सोळुंके,दिपक चाबुकस्वार, सुनिता सूर्यवंशी,पप्पुभाई शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments