औसा सोसायटीच्या नूतन चेअरमन व्हाईस चेअरमनचा सत्कार संपन्न 

औसा प्रतिनिधी 
औसा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक नुकतीच बिनविरोध संपन्न झाली.
13 जागेसाठी या निवडणुकीत 13 उमेदवारांचे अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली त्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या न्यूडीसाठी बैठकीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चेअरमनपदी गीतेश चंद्रकांत शिंदे, आणि वाईस चेअरमन पदी सनाउल्ला शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख तसेच काँग्रेस कमिटीचे लातूर जिल्हा अध्यक्ष श्रीशैल उटगे, तालुका अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष रशीद शेख, शहराध्यक्ष शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. नूतन चेअरमन गितेश शिंदे आणि वाईस चेअरमन सनाउल्ला शेख यांच्या निवडीबद्दल इरफान शेख व त्यांच्या मित्र मंडळाने सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शहराध्यक्ष शेख शकील, मुजम्मिल शेख, युनूस चौधरी, फारुख शेख, शिवसेना शहर प्रमुख सुरेश भुरे, आताऊल्ला शेख, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments