सद्गुरु गुरुबाबा महाराज यांचा जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार.
औसा प्रतिनिधी
औसा येथील नाथ संस्थान चे पाचवे पीठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला. नाथ संस्थानच्या माध्यमातून सद्गुरु गुरुबाबा महाराज यांनी आपल्या कीर्तन, प्रवचन व दिव्य चक्री भजनाच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून समाजप्रबोधनाचे व अध्यात्म जागृती चे कार्य केले आहे .त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने संस्कृतीक कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .हा मोलाचा पुरस्कार औसेकर महाराज यांना मिळाल्याबद्दल जिल्हा काँग्रेसच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार नाथ सभागृहामध्ये दिनांक 9 जून गुरुवार रोजी करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, ओबीसी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष प्रा. सुधीर पोतदार, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस मौलाना कलिमुल्लाह, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ॲड. बाबासाहेब गायकवाड, तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शेख शकील, ओबीसी काँग्रेसचे भागवत मेहेत्रे, नियामत लोहारे, विलासराव देशमुख युवा मंचचे रविकांत पाटील, खुंदमीर मुल्ला, माजी नगरसेवक अंगद कांबळे, सय्यद हमीद,जयराज ठाकूर, पुरुषोत्तम नलगे, आदमखॉ पठाण,सदानंद शेटे,
0 Comments