हजरत सूरत शाह उर्दु हायस्कूल चा एस.एस.सी. बोर्ड चा निकाल 93.93 टक्के.
औसा प्रतिनिधी
हजरत सूरत शाह उर्दु हायस्कूल औसा या विद्यालयाचा सन 2021-22 मध्ये घेतलेल्या एस.एस.सी. बोर्ड परिक्षेचा निकाल 93.93% लागला असून या विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे.या परिक्षेसाठी विद्यालयातून 33 विद्यार्थी परिक्षेस बसले होते.त्यापैकी 13  विद्यार्थांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली.तर 16 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 02 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.यवस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणा-या सर्व शिक्षकांचे संस्थेचे पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ, तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments