लातूर जिल्हा महासचिव सय्यद सलीम यांचा औशात सत्कार
औसा प्रतिनिधी.
औसा शहरत वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा महासचिव सय्यद सलीम यांचा वंचित बहुजन आघाडी औसा तालुकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. आगामी काळात
होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सय्यद सलीम यांचा औसा सदिच्छा दौरा व आढावा बैठक घेऊन शहरातील आगामी काळात येणाऱ्या नगरपालिकेची मोर्चेबांधणी व पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक बाबत चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी तालुकाध्यक्ष शिवरुद्र बिरोळे, महासचिव श्रावण कांबळे ,तालुका उपाध्यक्ष गंगाराम आरसुळे, उपाध्यक्ष सुर्यकांत उबाळे ,कायदेविषयक सल्लागार अँड गजानंद गिरी, शहराध्यक्ष इलियास चौधरी , लातूरचे युवा कार्यकर्ते आकाश इंगळे ,शहर उपाध्यक्ष वलीपाशा शेख, चांद लोने, बंडी पवारसह अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments