राज्याच्या शेतकरी विरोधी सरकारला मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटतो देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यामध्ये अडीच वर्षापूर्वी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाचे सरकार सत्तेत आले आणि महाविकास आघाडीच्या नावाखाली हे चालत असलेले सरकार शेतकरी हिताच्या विरोधात असून या सरकारला मुंबई म्हणजेच फक्त महाराष्ट्र वाटतो मुंबई बाहेरचा संपूर्ण महाराष्ट्र पाहायला या महा विकास आघाडी सरकारला वेळ नाही .असे टिकात्मक प्रतिक्रिया महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. औसा येथे आमदार अभिमन्यु पवार यांच्या संकल्पनेतून एक हजार किलोमीटर चे शेत रस्ते फळबाग लागवड आणि शेतकऱ्यांचा पशुधनाचे गोठे आणि मनरेगा तुन ग्रामसमृद्धी या उपक्रमाचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय रसायन मंत्री भगवंत खुबा, हे होते व्यासपीठावर खा सुधाकर शृंगारे, माजी पालक मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार रमेश आप्पा कराड, शेतकरी नेते पाशा पटेल, माजी आमदार गोविंद केंद्रे, विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव ,माजी खा डॉक्टर सुनील गायकवाड, प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके ,दिलीप राव देशमुख ,लातूर जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव ,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेतरस्ते फळबाग लागवड सिंचन विहिरी कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प आणि जनावरांच्या गोठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून आल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस औसा येथे आयोजित शेतकरी मेळावा व विविध कामाचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना पुढे म्हणाले की औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यु पवार हे लढवय्ये आमदार असून आपल्या आक्रमकतेने महाराष्ट्र विधानसभेमध्ये शेतकऱ्यासाठी सातत्याने ते आक्रमक भूमिका घेऊन लढत असतात आपल्या संकल्पनेतून त्यांनी शेतकऱ्यासाठी शेत रस्ते, शिव रस्ते, पानंद रस्ते, तसेच फळबाग लागवड, कंपोस्ट खत निर्मिती, आणि शेतकऱ्यांचा पशुधनासाठी गोठे बांधणी, सिंचन विहिरी, आणि शेततळे इत्यादी कामातून लोकसहभाग आणि स्वतःचा आमदार निधी याचा विनियोग करून मनरेगा तून ग्रामसमृद्धी हा औसा पॅटर्न राबवून संपूर्ण महाराष्ट्र राज्याला दिशा दिली. विरोधी पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अभिमन्यू पवार यांनी स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर औसा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक लोकोपयोगी कामे करून सत्ताधारी पक्षाला लाजवेल असे काम करून दाखविले. मागील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी च्या वतीने अनेक शेतकरी हिताच्या योजना हाती घेतल्या होत्या परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी शेतकरी हिताच्या सर्व योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचा विकास खुंटला असून आज शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. महा विकास आघाडी सरकारला फक्त मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटतो मुंबई च्या पलीकडे उर्वरित महाराष्ट्रात विकास कामे करण्यासाठी या सरकारला वेळ नाही खऱ्या अर्थाने शेतकरी हाच महाराष्ट्राच्या विकासाचा कणा असून जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्याही योजना देण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरत असल्याची जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आमदार अभिमन्यु पवार यांच्या सायकल संकल्पनेतून मनरेगा तुन ग्रामसमृद्धी या उपक्रमाच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी करून शेतकऱ्याचा चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सत्ता नाही म्हणून अभिमन्यू पवार रडला नाही शेतकऱ्यांच्या विकासासाठी सतत लढत राहिला अशी ही प्रतिक्रिया शेवटी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली यावेळी अध्यक्ष पदावरुन बोलतांना केंद्रीय रसायन मंत्री भगवंत खुबा म्हणाले की आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी सतत धडपडणारा असा लोकप्रतिनिधी मी अद्याप पाहिला नव्हता आजच्या कार्यक्रमांमध्ये पन्नास टक्के महिला शेतकऱ्यांची उपस्थिती हे त्यांच्या यशस्वी कार्याची पावती आहे असे सांगून नामदार भगवंत खुबा म्हणाले की मी केंद्रीय रसायन मंत्री म्हणून शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे खताची कमतरता भासू देणार नाही. तसेच शेतकऱ्यांना सौर ऊर्जा व इतर आवश्यक लागणाऱ्या बाबी साठी आपण सतत सहकार्य करू अशी ग्वाही दिली. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी आपण ही योजना शेतकऱ्यांसाठी रस्ते म्हणजे शेतकऱ्यांची रक्तवाहिनी असून ही जिवंत राहिली तर शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडू शकते म्हणून शेत रस्त्याचा प्रकरण राबविण्याची आपली संकल्पना यशाच्याकडे जात असून आज औसा मतदार संघामध्ये एक हजार किलोमीटरचे शेतरस्ते 1000 जनावरांचे गोठे आणि एक हजार हेक्टर फळबाग लागवड हा कार्यक्रम यशस्वी झाल्याने मनरेगा तुन ग्रामसमृद्धी ही योजना अधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने यशस्वी होत असल्याचा मला आनंद वाटत आहे असे प्रतिपादन केले. यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर रमेश आप्पा कराड आणि तालुका अध्यक्ष सुभाष जाधव यांचीही समयोचित भाषणे झाली औसा येथे आयोजित कार्यक्रमासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यासाठी शहरातील कार्यकर्ते व शेकडो महिलांनी शहराचा मुख्य रस्त्यावरून भव्य पदयात्रा काढून देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. या विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळाव्यासाठी औसा आणि निलंगा तालुक्यातून हजारो शेतकरी युवक आणि महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पंचायत समिती सदस्य दीपक चाबुकस्वार यांनी केले तर आभार प्रदर्शन कासार सिर्सी सर्कल चे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे यांनी केले.
0 Comments