महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सदगुरु गुरुबाबा महाराज यांचा सत्कार

औसा प्रतिनिधी.
 औसा येथील श्री नाथ संस्थानचे पाचवे पीठाधीपती सदगुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने उत्कृष्ट सांस्कृतिक कार्य पुरस्कार मिळाला हा पुरस्कार अत्यंत मानाचा पुरस्कार असून साहित्य, कला, संस्कृतीक, संगीत व विविध क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. परंतु २०२२ सालाचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने औसा येथील सदगुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांना मिळाल्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करून पत्रकारांनी आशीर्वाद घेतला. श्री नाथ संस्थांच्या वतीने प्रतिवर्षी ज्येष्ठ माशी उत्सव आयोजित करण्यात येतो या उत्सवामध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील शिष्यगण व भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. या उत्सवाची सांगता दिनांक 16 जून रोजी गोपाळ काल याने झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आसिफ पटेल, ज्येष्ठ पत्रकार शामभाऊ कुलकर्णी, रामभाऊ कांबळे, डॉ.जिलानी पटेल, मुक्तार मणियार, पाशाभाई शेख, इलियास चौधरी, मजहर पटेल यांच्यासह नाथ संस्थानचे शिष्यगण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments