चाकरवाडी अखंड हरिनाम सप्ताह निमित्त धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू 
औसा - (प्रतिनिधी)दि.११
 संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडी यांच्या 22 व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सप्ताह काळामध्ये अभंगवाणी संगीत भजन किर्तन व भारुड अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित शिवकुमार मोहेकर, हरिकीशन देवकर, संजय देवकर, महेश कंटे, बाबुराव बोरगावकर, यादवराज फड यांचे संगीत भजन गायन तसेच ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे प्रकाश महाराज बोधले ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम, संजय महाराज पाचपोर अर्जुन लाड महाराज, बाळू महाराज गिरगावकर आणि संदीपान महाराज हासेगावकर यांचे कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 12 जून रोजी महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त श्री विष्णु महाराज भांडे आणि दिनांक 13 जून रोजी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी श्रीक्षेत्र पंढरपूर यांच्या भारुडाची जुगलबंदी होणार आहे. दिनांक 14 जून रोजी वटपौर्णिमेच्या निमित्ताने रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज नागपूर यांचे काल्याचे किर्तन सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार असून राम रामायणाचार्य रामराव ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.  तरी सर्व भाविक भक्तांनी धार्मिक कार्यक्रमाचा आणि दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह संयोजन समितीच्या वतीने करण्यात येते.

Post a Comment

0 Comments