औसा विविध कार्यकारी सेवा सहकार्य सोसायटीच्या अध्यक्षपदी गितेश शिंदे तर उपाध्यक्षपदी सनाउल्ला शेख यांची निवड..
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था औसा या सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्ष  पदाच्या निवडीसाठी कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे  यांच्या मार्गदर्शनाखाली गितेश शिंदे अध्यक्षपदी, शेख सनाउल्ला ईसुलाल दारुवाले उपाध्यक्ष पदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सदस्य सुग्रीव  विठ्ठलराव पाटील,दुधनकर राजकुमार रघुनाथ,जयराजसिंग कुंदनसिंग बायस,उमेश गणपतराव पाठक, हणमंत अंबादास थोरात, रविशंकर प्रभुअप्पा राचट्टे, वसंतराव संतराम माळी,बब्रु शंकर गाडेकर,सौ.गिताबाई व्यंकट जाधव,सौ.सुनिता तुकाराम चव्हाण, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रशीद शेख, उपाध्यक्ष म.युनुस चौधरी,दिलावर तत्तापुरे,खुंदमीर मुल्ला, बालाजी शिंदे आदिची उपस्थिती होती.त्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सदस्यांनी सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या निवडीबद्दल त्यांच्या मित्र परिवारामध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments