*लातूर जिल्ह्यातील विविध तहसील वर निराधारांनी केली जिआर ची होळी*
औसा प्रतिनिधी
औसा: लातूर जिल्ह्यातील विविध तहसीलदार कचेरीत निराधारांनी दर वर्षी उत्पन्न दाखल्याची मागणी करणाऱ्या शासन निर्णयातील जाचक अटींचे प्रतिकात्मक दहन करून होळी करून सरकारच्या नावाने बोंबा मारून निषेध व्यक्त केला.
   निराधार संघर्ष समिती च्या वतीने राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात विधवा,परित्यक्ता, घटस्फोटित महिला,दुर्धर आजार ग्रस्त व्यक्ती,वयोवृद्ध महिला पुरुष आणि दिव्यांग बांधवांच्या न्यायासाठी विविध स्वरूपात उग्र असे आंदोलने सुरू आहेत.
20 ऑगस्ट 2019 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शासन निर्णय घेऊन सामाजिक न्याय विभागाच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आर्थिक लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी दर वर्षी आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर 30 जुनपूर्वी 21 हजार रुपये च्या आतील उत्पन्न प्रमाण पत्र सादर करावे अन्यथा मानधन बंद करण्यात येईल अशी जाचक अट घातलेली असल्याने या लाभार्थ्यांची प्रचंड हालअपेष्टा उठलेली आहे.विद्यमान सरकारने 3 मे 2021 ला परिपत्रक काढून फडणवीस सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केल्याने एकच तारांबळ उडालेली आहे.
या अन्यायकारक धोरणाला विरोध करून गोरगरीब माणसाच्या हक्कासाठी निराधार संघर्ष समिती ने विविध सामाजिक संघटना संस्था, पक्ष,मंडळ याना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केल्याने शेतकरी संघटना,कामगार संघटना गणराज्य संघ इत्यादी चे पदाधिकारी यांनी समर्थन दिल्याने 28 जून रोजी लातूर कलेक्टर ऑफिस वर लाखो निराधारांच्या उपस्थितीत महाआक्रोश मोर्चा निघणार आहे
आज शासन निर्णयातील जाचक अटींची होळी करण्यासाठी राजेंद्र मोरे ,राजीव कसबे यांच्यासह सत्तार पटेल,राजकुमार होळीकर, अरुण दादा कुलकर्णी, राजेंद्र शिंदे,बाबासाहेब बनसोडे, दीपक गंगणे,शेषराव गायकवाड, शीतल तमलवार,सुमनताई कांबळे, मोहिनी कांबळे,सुरेखा आयवळे, पूजा सर्जे, भरत पाटील,श्याम जाधव,धनाजी दोरवे,दत्ता सूर्यवंशी, दगडू बरडे, हेमंत पाटील,शिवाजी बीबीनवरे, शरीफखान पठाण,सुरेश सूर्यवंशी, बळी कसबे,सचिन शिंदे आणि असंख्य निराधार,अपंग,वृद्ध महिला पुरुष उपस्थित होते

Post a Comment

0 Comments