प्रा. दुष्यंत आनंदराव शिंदे यांना पीएच.डी.पदवी प्रदान 

औसा प्रतिनिधी

आझाद महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. दुष्यंत आनंदराव शिंदे जाजनूरकर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तर्फे मराठी विषयात  ' विद्यावाचस्पती ' पदवी बहाल केली आहे. त्यांनी डाॅ.शंकरानंद येडले यांच्या मार्गदर्शनाखाली  'मराठवाड्यातील कादंबरी वाड्मयातून  चित्रित झालेल्या तरूणांचा विशेष अभ्यास ' या विषयावर आपला शोधप्रबंध विद्यापीठास सादर केला होता. 
त्यांच्या या यशाबद्दल संस्थासचिव डाॅ.अफसर शेख, प्राचार्य डाॅ.ई.यू. मासुमदार, उपप्राचार्य तनवीर जहागीरदार, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments