सातत्य ग्रुप तर्फे एमआयडीसी परिसरात एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील सातत्य ग्रुप तर्फे एमआयडीसी परिसरात एक हजार वृक्षलागवडीचा संकल्प सातत्य ग्रुपचे ॲडमिन सामाजिक कार्यकर्ते जयराज कसबे व त्यांच्या टीमने घेतला आहे. या संकल्पची सुरुवात आज दिनांक 1 जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला आल्यानंतर सातत्य ग्रुपने एक नाविन्यपूर्ण एक हजार वृक्षरोपण संकल्प हाती घेतला. या संकल्पनेला लातूर येथील उद्योजक अजय मुंदडा यांनी वृक्ष देण्याचा निर्धार केला आहे. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत एक हजार वृक्ष लागवड होईल अशी माहिती सातत्य ग्रुपचे ऍडमिन जयराज कसबे यांनी दिली.आज सकाळी एमआयडीसी परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी सातत्य ग्रुपचे ॲडमिन जयराज कसबे, लातूर येथील प्रसिद्ध उद्योजक अजय मुंदडा, भारत इंटरप्राईजेसचे चेअरमन मुजम्मिल शेख, इंडिया टीव्हीचे लातूर जिल्हा प्रतिनिधी आसिफ पटेल,ॲड.एफ.एस पटेल, सागर खानापूरे, सकीब शेख,पाटील, माजी सैनिक, अधिकारी व मॉर्निंग वॉकला आलेले मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments