शालांत  परिक्षेतील अशरफअली नदीम सय्यद यांचे उज्वल यश
 औसा प्रतिनिधी
 औसा  येथील चक्रधर विद्यालय या शाळेचा माध्यमिक शालांत परीक्षेचे मध्ये उत्कृष्ट निकाल लागला असून चक्रधर विद्यालय औसा या शाळेचा विद्यार्थी अशरफअली नदीम सय्यद या विद्यार्थ्याने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करीत 87.80 टक्के गुण प्राप्त केले आहेत. अशरफ अली नदीम सय्यद हा पत्रकार नदीम सय्यद यांचा मुलगा असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्याने 87 पॉईंट 80 टक्के गुण संपादन करीत उज्ज्वल यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शब्बीर मिया शेख, मुख्याध्यापक सुलतान शेख तसेच चक्रधर विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. अशरफ अली सय्यद यांच्या या उज्वल यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments