औसा येथे संत बाळूमामा मंदिरात उद्या मूर्तीची स्थापना
 औसा प्रतिनिधी
 श्री संत बाळूमामा यांच्या भक्तगणांचा प्रयत्नातून औसा येथे खुर्द वाडी शिवारात विश्वनाथ लिंबाजी कांबळे यांच्या शेतात श्री संत बाळूमामा यांच्या मंदिराची उभारणी झाली असून या मंदिराचा कलशारोहण आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उद्या दिनांक 8 जून रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते आमदार अभिमन्यु पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख, ह भ प एकनाथ महाराज इरला आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे .श्री संत बाळूमामा यांच्या आशीर्वादाने भक्तांमध्ये आनंद असतो औसा शहरातून दिनांक 6 जून रोजी मूर्तीची मिरवणूक धनगरी ढोलाच्या निनादात काढण्यात आली. मूर्ती स्थापना आणि कलशारोहन कार्यक्रमानिमित्त भाविक भक्तांनी दिनांक 8 जून रोजी दर्शन व महाप्रसादासाठी उपस्थित रहावे असे आवाहन विश्वनाथ कांबळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments