बाबूप्पा आष्टुरे यांचे निधन

 औसा प्रतिनिधी 

औसा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त ज्येष्ठ कर्मचारी बाबूप्पा तमनप्पा आष्टुरे व 74 वर्ष यांचे रविवार दिनांक 12 जून रोजी सकाळी वृध्द कालीन आजारामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक विवाहित मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे.दिवंगत बाबूप्पा आष्टुरे हे नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष बिल कलेक्टर म्हणून त्यांनी प्रदीर्घ सेवा केली होती. औसा येथील सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक राजेश आष्टुरे, कुमार स्वामी महाविद्यालयाचे प्रा संजीव कुमार, आणि अडवोकेट विजयकुमार आष्टुरे यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थिवावर रविवार दिनांक 12 जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वीर्शैवलींगायात समाजच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी सकाळी 11 वाजता करण्यात आले. अंत्यविधीसाठी समाजबांधव व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments