प्रभाग क्रमांक 3 मध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

औसा प्रतिनिधी.
 औसा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये नगरपरिषदेच्या सार्वजनीक विहिरीजवळील परिसरातील नागरिकांच्या नळाला पाणी येत नसल्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्याविना हाल होत आहेत. या ठिकाणी बोरला विद्युत कनेक्शन देऊन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने करावी व येथील होणाऱ्या रस्त्याचे काम करण्यापूर्वी अंतर्गत पाईपलाईन करूनच रस्त्याचे काम करावे अशी मागणी नगर परिषद औसा यांना परिसरातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. सार्वजनिक विहिरी जवळ सूर्यवंशी यांच्या घरापासून पिठाच्या गिरणी पर्यंत पाईपलाईन कमकुवत झाल्याने या परिसरातील नागरिकांना उच्च दाबाने पाणी येत नाही. त्यामुळे नागरिक पाण्याविना त्रस्त झाले आहेत. प्रभाग 3 मधील बोरवेलला पाईपलाईनचे कनेक्शन देऊन नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था करून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी नगर परिषद औसा व जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर चांद बागवान, नसीमा शेख, साबिया शेख, हबीब शेख, जहीर शेख यांनी माजी उपनगराध्यक्ष कीर्ती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेस दिलेल्या निवेदनाद्वारे या नागरिकांनी मागणी केली आहे.

चौकट ://...
प्रभाग क्रमांक 3 मध्ये रस्त्याचे काम प्रशासन घाईघाईने करत आहे. परंतु प्रशासनाने या भागातील रस्त्याचे आणि नालीचे काम करण्यापूर्वी पाणीपुरवठ्याची जीर्ण झालेली पाईपलाईन दुरुस्त करून मगच रस्त्याचे काम करणे उचित राहील जेणेकरून रस्ता तयार केल्यानंतर पाईपलाईन साठी रस्ता फोडण्याची गरज भासणार नाही अशी प्रतिक्रिया माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments