गेल्या आठ महिन्यापासून पगार नसल्याने
24 तास सेवा बजावणाऱ्या वाहनचालकांवर उपासमारीची वेळ
जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले निवेदन
*बी डी उबाळे*
औसा- लातूर जिल्हा अंतर्गत
(CSC)सीएससी मार्फत आरोग्य विभागांमध्ये काही कर्मच्यान्यांची सप्टेबर 2021 मध्ये भरती
करून घेण्यात आले आहे.
तरी नोव्हेबर पासून ते आजतागयात 8 महिन्याचे वेतन कर्मच्यान्यांना प्राप्त झालेले नाही.बिना वैतन आज पर्यत चोवीस तास जवाबदारीने काम करणाऱ्या कर्मचारिना वेतन मिळाले नाही.
तरी आजच्या हया महागाईच्या काळात घर भाडे, प्रवासाचा खर्च,खाण्यापिण्याचा खर्च देण्यास खूप अडचणी निर्माण होत आहेत. पगारीच्या भरोशावर आई,पत्नीच्या अंगावरील दागिने ठेवून कर्ज काढण्यात आले आहे. 
8 महिन्यापासून व्याज त्यांची
परतफेड कशी करावी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.बिना वेतन आता पर्यत घर चालत
आला आहे ह्या पुढे आता पुढील संसार चालवण्यासाठी माइ्याकड़े पैसे नाहीत. मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तरी आपणास नमृ विनंती आहे की, कर्मच्यान्यांच्या वेतनाबाबत लवकरात लवकर निर्णय
घ्यावा अशी अपेक्षा या चालक कर्मचारी याच्याकडून जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments