औसा नगरपालिकेच्या प्रभागाचे आरक्षण जाहीर 23 पैकी 12 जागा महिलांसाठी आरक्षित. 

औसा प्रतिनिधी 

औसा नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 11 प्रभागातील 23  जागेसाठी दिनांक 13 जून सोमवारी रोजी औसा येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहामध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली.
 औसा रेनापुर उपविभागीय कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे आणि मुख्याधिकारी रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एका लहान बालकाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत काढण्यात आली .औसा नगरपरिषदेच्या 23  जागेपैकी 12 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण जागा आरक्षित झाल्या असून त्यापैकी 2 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत .प्रभाग क्रमांक एक आणि तीन मध्ये अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक 6  मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असून उर्वरित सर्व प्रभागांमध्ये प्रत्येकी एक महिला व एक सर्वसाधारण असे आरक्षण काढण्यात आले आहे. या वेळी नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचा अद्याप निर्णय न झाल्यामुळे सदर आरक्षण सोडतीमध्ये नागरिकाच्या
मागास प्रवर्गाचे आरक्षण नसल्यामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष पसरला आहे या आरक्षण सोडतीच्या वेळी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांमध्ये आता उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments