हासेगाव: फिजिओथेरीपी महाविद्यालयाचा १००% निकाल 
   औसा प्रतिनिधी  
   महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या अंतर्गत उन्हाळी परीक्षा 2022 घेण्यात आलेल्या,श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था  संचलित ,लातूर कॉलेज ऑफ फिजीओथेरपी ,हासेगाव या महाविद्यालयाचा निकाल १००% लागलेला आहे. प्रथम वर्षामध्ये प्रथम क्र. मानसी हंकारे ७४.५ %,द्वितीय क्र .सय्यद निशान खाजिम ७१.४ %,व तृतीय वर्षामध्ये प्रथम क्र. ऐश्वर्या राठोड ६२.४०% आणि नेहा ब्राह्मणे६१.२० % या विद्यार्थ्याने घवघवीत यश प्रधान केले आहे. तसेच संस्थेच्या अंतर्गत ज्ञानसागर विद्यालय हासेगाव,व लातूर  कॉलेज ऑफ सायन्स,लातूर  या १० वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याचा व पालकांचा संस्थेच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
     तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विरेंद्र मेश्राम यांनी केले. व श्री वेताळेश्वर बावगे यांनी विद्यार्थ्याशी आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की "आई-वडिलांना आनंदी ठेवण्यासाठी तुमच्या निकाल हा महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेकडे वळावे करिअर करण्याची संधी खूप आहे. अपयश आले तर निराश होऊ नका पुन्हा प्रयत्न करा "असे सांगितले तर श्री शिवलिंग जेवळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना "विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या पाठीमागे तुमच्या आई वडीलाचे फळे आहेत विद्यार्थ्यांनी आई वडीलाचे स्वप्न घेऊन शिक्षण घेतल पाहिजे असे सांगितले. "या निकाला निमित्त विद्यार्थी व पालकांच्या हस्ते वृक्षारोपण केले.
    तसेच या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर आप्पा बावगे, संचालक आत्माराम मुलगे , प्राचार्य श्री नंदकिशोर बावगे, प्राचार्य  डॉ. श्यामलीला बावगे, प्राचार्य योगिता बावगे, मुख्याध्यापक  श्री कालिदास गोरे ,प्राचार्य चौधरीसर डॉ.उमा पावडशेट्टी ,डॉ. पल्लवी तायडे ,डॉ.श्रद्धा नागमोडे ग्रंथपाल ज्ञानेश्वर कांबळे यांनी अभिनंदन केले तर या कार्यक्रमाचे समारोप करिष्मा शिंदे तर सूत्रसंचालन मयुरी तवधरकर आणि ऋतुजा जंगम यांनी केले.या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments