राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाची आलमला येथून सुरुवात
औसा प्रतिनिधी
  अलमला राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमाची सुरुवात दिनांक  18 जून 2o22  रोजी शनिवारी अलमला येथून माननीय श्री अविनाश कांबळे उपविभागीय अधिकारी औसा, रेनापुर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली   प्रमुख पाहुणे म्हणून  सन्माननीय श्री भरत सूर्यवंशी साहेब तहसीलदार औसा हे उपस्थित होते शासनाच्या विविध योजना संजय गांधी निराधार श्रावणबाळ विधवा महिला परित्यक्त व अन्य कोणत्याही योजनेसाठी उपयुक्त लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र घेण्यासाठी दररोज तहसील मध्ये हजारो लोक ज्येष्ठ नागरिकांसह येतात या लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी आपली योग्यता प्रमाणपत्र काढण्याची गरज असते या लोकांची अडचण ओळखून तहसील विभाग औसा ने नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात आलमला येथून सुरू केली आहे की जेणेकरून तहसीलमधील ज्यांच्या ज्यांच्याकडे आवश्यक लागणारी कागदपत्रे असणारे संबंधित लोक त्या त्या गावांमध्ये जाऊन सर्व गरजू लोकांना योग्य प्रमाणपत्र गावातच वाटप करण्याचे    आयोजन ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय आलमला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला होता सर्वप्रथम ग्रामपंचायत ग्रामपंचायत कार्यालय विकास सोसायटी विवेकानंद वाचनालय यांच्या वतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री तसीलदार साहेब यांनी या उपक्रमाविषयीची माहिती सांगताना सर्व शासकीय योजनेचा उपयोग घेण्यासाठी कागदपत्रे मिळवण्यासाठी दररोज लोकांची होणारी पायपीट थांबावी ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आल्याचे सांगितले तर अध्यक्षीय समारोप करतेवेळी श्री अविनाश कांबळे साहेब यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले आणि जे लाभार्थी चुकीच्या पद्धतीने वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेतात त्यांनी तो टाळावा आणि ज्यांना ज्यांना वेगवेगळ्या योजनेचा आर्थिक लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी अशा उपक्रमातून आपले कागदपत्र दाखल करून योग्य प्रमाणपत्रे घेऊन आपण कोणत्या योजनेमध्ये आहोत त्याचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले आणि सरपंच व तलाठी कार्यालयाचे  उपक्रमाबद्दल अभिनंदन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी सदानंद सुरवसे भागवत सोनवते तलाठी प्रदीप चव्हाण अव्वल कारकून तहसील सरपंच कैलास निलंगेकर, चेअरमन विश्‍वनाथ बिराजदार  , सुरेंद्र पो पाटील औसा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सुरेंद्र पाटील ,प्रभाकर सचिव विवेकानंद वाचनालय कापसे अहमद तांबोळी व्हॉइस चेअरमन राठोड साहेब ग्रामसेवक ग्रामपंचायतचे सदस्य गुरुनाथ अंबुलगे सोसायटीचे सर्व सदस्य व तहसील मधील संबंधित कर्मचारी व ग्रामपंचायत सोसायटी वाचनालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच श्री कैलास निलंगेकर यांनी केले व गावांमधील उपक्रमाविषयी ची सविस्तर माहिती सांगितली तसेच सूत्रसंचालन पी सी पाटील यांनी केले आभार प्रदर्शन श्री नरेंद्र पाटील यांनी मानले  असंख्य लाभार्थ्या ना या उपक्रमाचा फायदा झाला.

Post a Comment

0 Comments