विद्याताई पाटील यांना दिल्ली पोलिसांकडून अटक
 औसा प्रतिनिधी
 महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई पाटील यांना दिनांक 13 जून रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे याबाबतची माहिती अशी की राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या वतीने अंमलबजावणी संचालनालयाकडून ईडी मार्फत चौकशी करण्यासाठी ची कार्यवाही करण्यात आली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशावरून महिला आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई पाटील यांनी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निषेध निदर्शने करीत काँग्रेस पक्षाचे युवानेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्यावर होत असलेल्या अन्याय विरोधात विद्याताई पाटील दिल्ली येथे आंदोलन करीत  असताना दिल्ली पोलिसांनी विद्याताई पाटील यांनाही अटक करून ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी व त्यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय सोडणार नाही असा पवित्रा दिल्ली पोलिसांनी घेतला असून सुमारे पाचशे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
 महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचा उपाध्यक्ष विद्याताई पाटील यांना दिल्ली पोलिसांकडून अटक राहुल गांधी यांच्या कुटुंबियांची ईडी मार्फत चौकशी होत असताना आंदोलन करीत असल्याचे कळते.

Post a Comment

0 Comments