पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी औसा पालिकेची प्लास्टिक विरोधी धडक मोहीम 

औसा प्रतिनिधी 
औसा नगर परिषदेने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी औसा शहरातील व्यापाऱ्यांना प्लास्टिक वापरावर बंदी आणित प्लास्टिक विरोधी धडक मोहीम राबवली आहे दिनांक 13 जून रोजी औसा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शहरातील फळ विक्रेते, भाजी विक्रेते, किराणा व्यापारी व कापड व्यापारी यांच्याकडील असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग व नॉन ओवन बॅग अशा सर्व प्रकारच्या पर्यावरणाचा त्रास करणाऱ्या पिशव्या जप्त करून व्यापाऱ्यांमध्ये अचानक घबराट निर्माण केली आहे. मागील अनेक दिवसापासून शहरांमधील व्यापारी प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर करीत असल्याने प्लास्टिक पिशव्या नालीमध्ये अडकून नाल्यात तुंबत आहेत. तसेच यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने शहरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी रणदिवे यांनी औसा शहरात प्लास्टिक बेळगावात वापरण्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी शहरातील व्यापाऱ्याकडून प्लास्टिक पिशव्या कॅरीबॅग व नॉन ओव्हन जप्त करून नगरपालिके समोर म्हणून यापुढे प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या व्यापार्‍यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
 केंद्रशासनाच्या कचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 मधील तरतुदीप्रमाणे प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापार्‍यावर यापुढे  कार्यवाही करण्यात येईल असेही मुख्याधिकारी यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments