वृक्षारोपण करून साजरा वाढदिवस
औसा :- औसा तालुक्यातील तपसेचिंचोली येथील पत्रकार प्रशांत नेटके यांनी दिनांक 11 जून 2022 रोजी त्यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला.
ऑक्सिजनची गरज व झाडांचे महत्व लक्षात घेऊन व सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार प्रशांत नेटके यांच्या वतीने तपसेचिंचोली येथील खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच मारुती नेटके ,चंद्रकांत गुरव ,खंडू नेटके,सतीश पाटील,किसन बनसोडे, प्रमोद नेटके,रितेश सरवदे,व्यंकट सुरवसे, गणेश नेटके ,महादू कांबळे,हणमंत नेटके ,मारुती शिंदे ,दिलीप नेटके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
*वृक्षारोपण काळाची गरज -प्रशांत नेटके
0 Comments